Pune News : पुण्यात दिवसाढवळ्या घरात शिरून चोरट्यांनी महिलेला बेशुद्ध केले अन् …

एमपीसी न्यूज : पुण्याच्या येरवडा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवसाढवळ्या एका महिलेच्या घरात प्रवेश करू एका बुक्कीत तिला बेशुद्ध केले आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. शनिवारी दुपारच्या सुमारास गांधीनगर परिसरात ही घटना घडली. याघटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर, दुसरीकडे गुन्हेगार चांगलेच निर्डावले असल्याचे दिसत आहे. 

याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा् दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या येरवड्यातील गांधीनगर परिसरात राहतात. रस्त्याच्या कडेला त्यांचे घर आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास त्या एकट्याच घरी होत्या. त्याचवेळी दोन चोरटे अचानक त्यांच्या घरात शिरले. एकाने त्यांना जोरात बुक्की मारली आणि यामध्ये त्या बेशुद्ध पडल्या. त्यातील एकाने तोंडाला कपडा बांधलेला होता.

त्यांनी आरडाओरडा करण्यापुर्वीच एकाने त्यांच्या डोक्यात एक बुक्की मारली. त्यात त्या बेशुद्ध पडल्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात असणारे दागिने व घरातील ३ हजारांची रोकड चोरून पोबारा केला. तक्रारदार शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटे पसार झालेले होते. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.