Pimpri News: पवना धरणात 93 टक्के पाणीसाठा; शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटला

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात 92.81 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरण परिसरात मागील 24 तासात 10 मिली मीटर पावसाची नोंद झाली. 1 जून पासून 61.22 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील  बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.  सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. पवना धरण परिसरात पावसाने मागील 15 दिवसांपूर्वी जोरदार बॅटिंग केली होती.

त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. जुलै महिन्यातच धरण 85 टक्क्यांच्या पुढे गेल्याने  दोन दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.  नदी, ओढे यातून धरणात येवा चालू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू असून धरणात आजमितीला 92.81 टक्के पाणीसाठा आहे.

पवना धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = *10मि.मि.*

#  1 जूनपासून झालेला पाऊस = *1963मि.मि.*

# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =       718
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = *92.81% टक्के*

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = *       42.18% टक्के*

# गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= *0.54% टक्के*

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = *61.22% टक्के*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.