Pune News : दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत; तर हॉटेल रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने निर्बंध शिथील केले आहेत. दुकान, हॉटेलच्या वेळा वाढविल्या आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत तर हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सर्व दिवस रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसरी लाट आली नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे त्यामुळे राज्य शासनाकडून निर्बंध शिथील केले जात आहेत. आता दुकानांच्या वेळाही वाढविल्या आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी आजपासून दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत तर हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सर्व दिवस रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

तर, महापालिका क्षेत्रातील अम्युझमेंट पार्क, संग्रहालय, इंडस्ट्रीज शुक्रवारपासून सुरु होतील. यामध्ये फक्त मोकळ्या जागेतील कोरड्या राईड्स साठी परवानगी राहील, पाण्यातील राईड्ससाठी मनाई आहे. हे आदेश पुणे, खडकी कटक मंडळालाही लागू राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.