Talegaon Crime News : बनावट हार्पिक टॉयलेट क्लीनर विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई

एमपीसी न्यूज – हार्पिक टॉयलेट क्लिनरचा ट्रेडमार्क आणि लोगो लावून बनावट टॉयलेट क्लिनर विकणा-या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्या दुकानातून 47 बनावट बॉटल्स पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजता गहुंजे मधील लोढा वसाहत येथे करण्यात आली.

अशोककुमार अमराराम चौधरी (वय 30, रा. लोढा वसाहत, गहुंजे, ता. मावळ) याच्या विरोधात कॉपी राईट ऍक्ट 1977 चे कलम 63, 65, ट्रेडमार्क ऍक्ट सन 1999 कलम 103, 104 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशरफउद्दीन फैजोद्दीन इनामदार (वय 36, रा. रहाटणी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोढा वसाहत येथील पुणेरी फ्रेश मार्ट या दुकानात रेकीट बेंचीझर इंडिया प्रा ली या कंपनीचा हार्पिक टॉयलेट क्लिनरचा ट्रेडमार्क व लोगो असलेल्या वेगवेगळ्या साईजच्या चार हजार 434 रुपये किमतीच्या 47 बाटल्या ठेवल्या. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्यावर कारवाई केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.