Chinchwad News : सात लाखांची रोकड असलेली बॅग कामगाराच्या हातातून पळवली

एमपीसी न्यूज – पाच अनोळखी चोरटयांनी मारहाण करीत कामगाराच्या हातातील सात लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. ही घटना बुधवारी (दि. 1) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. 

याप्रकरणी भीमसेन वदीसिंग राजपूत (वय 31, रा. सोनवणेवस्ती, चिखली) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमसेन यांच्या कंपनीत काम करणारे अभिषेक शीरसट आणि शंकर बिका हे दोघेजण कंपनीचे पैसे घेऊन वाल्हेकरवाडी येथून जात होते.  दरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी त्यांना अडवून मारहाण केली. तसेच, अभिषेक यांच्या हातात सात लाख तीन हजार 650 रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.