Akurdi News : कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाची दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाची दुचाकी चोरट्याने भर दिवसा चोरून नेली. ही घटना आकुर्डी येथील खंडोबाचा माळ येथे सोमवारी (दि. 29) रात्री उघडकीस आली.

सुनील शिवाजी गायकवाड (वय 34, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी खंडोबाचा माळ येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास उभी केली. कर्तव्यावरून ते निगडी वाहतूक कार्यालयात जाण्यासाठी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ते निघाले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. या दुचाकीमध्ये 30 हजारांची रोकड, पोलीस ओळखपत्र, एटीएम कार्ड, पासबुक, पॅनकार्ड असा ऐवज होता. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.