Pune News : नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात, 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

एमपीसी न्यूज : पुण्यातील नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही. याठिकाणी आज पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. उतारावर कंटेनर मागे सरकल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मुंबईहून सातार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले. आणि कंटेनर उताराच्या दिशेने पाठीमागे सरकत गेला. यामध्ये पाठीमागे असणाऱ्या काही वाहनांना त्याची धडक बसली.

यामध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. अद्याप मृतांचा अथवा जखमींचा नेमका आकडा समोर आला नाही. परंतु या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याचे सांगितले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.