Duggu Missing Case : जनतेच्या पैशातून लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे दंड वसुलीसाठीच आहेत का ? 

एमपीसी न्यूज : बाणेर परिसरातून अपहरण झालेला डुग्गू उर्फ स्वर्णव सतीश चव्हाण (वय 4) अखेर सापडला आणि पोलिसांसह सर्वांनीच निश्वास सोडला. तत्पूर्वी त्याचा शोध घेण्यासाठी मागील आठ दिवसांपासून पोलिसांनी संपूर्ण बाणेर परिसर पिंजून काढला होता. परंतु तरीही त्याचा शोध लागला नव्हता. अखेर अपहरणकर्त्यांनी त्याला पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे सोडून दिले आणि पळ काढला. डुग्गू सापडल्यानंतर सर्व आनंदी झाले परंतु आता मात्र सोशल मीडियावरून काही प्रश्न विचारले जाऊ लागले. 

पुण्यातील बाणेर हा परिसर उच्चभ्रू आणि स्मार्ट समजला जातो. या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. परंतु यातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणकर्ता दिसलाच नाही. जा सीसीटीव्ही कॅमेरात तो दिसला तो फोटो स्पष्ट आला नाही.. तर पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून आले.. त्यामुळे जनतेच्या पैशातून रस्त्यावर जागोजागी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त दंड वसूल करण्यासाठीच आहेत का असा सवाल सोशल मीडियातून विचारला जात आहे.

असा सापडला डुग्गु 

डुग्गूचे अपहरण झाल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर अपहरणकर्त्याने स्वतःच मुलाला सोडून पलायन केल्याचे समोर आले आहे. बालेवाडी येथील पुनावळे परिसरातील एका कंपनीजवळ घेऊन आला. तिथे त्याने बसलेल्या कामगारजवळ बालकाला सोडले. ‘ अन मी दहाच मिनिटात आलो म्हणून तो अपहरणकर्ता सांगून गेला. मात्र बराच वेळा झाला तरी तो आला नाही. कामगाराजवळ ठेवलेला मुलगाही रडू लागल्याने कामगाराने त्याची पिशवी पहिली. त्यात मोबाईल क्रमांक मिळाला.

त्याने संपर्क साधला. त्या कामगाराने त्या नंबरवर फोन केला. तो फोन बालकाच्या आई -वडिलांचा होता. पालकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पुढे मुलगा तोच आहे का हे पाहण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. त्याची खात्री करून घेतली. खात्री होताच पोलिसांनी पालकाच्या मदतीने घटना स्थळावर धाव घेतली. घटनास्थळावर मुलगा आढळल्याने मुलाच्या आईवडिलांच्या जीवात-जीव आला. पोलिसांनीही सुटकेचाश्वास सोडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.