Pune Crime News: उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पालघनचे वार करून ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिघांनी बेदम मारहाण करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी अल्लाबक्ष यासीन शेख (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर महबूब शेख, वसीम मेहबूब शेख आणि अन्य एक अनोळखी इसम अशा तिघं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी समीर शेख याने फिर्यादी अल्लाबक्ष शेख यांच्याकडून दोनशे रुपये उदार घेतले होते. हे पैसे मागण्यासाठी अल्लाबक्ष बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरी गेले होते.

उधारीचे पैसे मागत असल्यामुळे आरोपीला राग आला आणि त्यांनी फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर पालघन सारख्या हत्याराने वार केले. तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केली असून एका आरोपीला अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.