Pune News : मेट्रोच्या कामाला विरोध करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : मेट्रोच्या कामाला विरोध करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न पुण्यातील शिवाजीनगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामकाजा दरम्यान कामाला विरोध करत एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. कामगार पुतळा वसाहत परिसरात महापालिकेकडून कारवाई सुरू असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महापालिकेलीत प्रभारी सहाय्यक आयुक्त रवी खंदारे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर येथील न्यायालयासमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. कामगार पुतळा वसाहतीतील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिकेकडून त्यांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वसाहतीत कांबळे यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी कारवाई सुरू असताना कांबळे तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या तिघांनी कारवाईस विरोध केला.

तसेच, आरडाओरडा करून खांबावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तर, महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांना धमकावत सरकारी कामात अडथळा आणला. अधिक तपास उपनिरीक्षक अरविंद म्हस्के तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.