Bhavani Peth : पुण्यात व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे गजाआड

एमपीसी न्यूज – पुण्यात व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने (Bhavani Peth) अटक केली आहे. हे दरोडेखोर शनिवारी (दि.24) भवानी पेठ येथील एका व्यापाऱ्यावर दरोडा टाकणार होते.

आमान समीर शेख (वय 22, रा. भवानीपेठ), अमीर समीर शेख (वय 22 रा. भवानीपेठ), अमोल अनिल अंबवने (वय 20 रा. भवानीपेठ), शाहरुख दाऊद सय्यद (वय 26 रा. कोंढवा), सादिक अमीर शेख (वय 25 रा.भवानीपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Nigdi Police : धाडसी महिला पोलिस अमलदाराने दरोडा टाकण्यासाठी बँकेत आलेल्या टोळीला पिस्तुलासह केले जेरबंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात गस्त घालत असताना गुन्हे शाखा एकच्या पथकाला खबर मिळाली की, भवानी माता मंदिरा जवळील त्रिकोणे गार्डन येथे काही जण जमणार असून ते कोठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत अशी खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला असता काही जण संशयीत रित्या मिरा हॉस्पिटल पुढे (Bhavani Peth) चर्चा करताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात चौकशी केली असता भवानी मंदिराजवळील एक व्यापारी रोज रात्री दुकानबंद करून कॅश जवळ घेऊन जात असतो, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असते त्याच्यावर पाळत ठेवून त्याला लुटण्याच्या तयारीत आरोपी असल्याचे त्यांनी पोलीस तपासात सांगितले.

यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 2 कोयते, नायलॉन दोरी, मिरची पुड, लाकडी दांडके असे साहित्य जप्त केले. आरोपी यांच्या विरोधात  या आधीही खुनाचा प्रयत्न, मारामारी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपींना खडक पोलीसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास गुन्हे शाखा एकचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.