Environment Day 2022 : सनी निम्हण यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ला मोठा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या (Environment Day 2022) निमित्ताने 5 जून ते 15 जून 2022 दरम्यान आम्ही औंध, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ हा एक विशेष हरित उपक्रम राबविला जात आहे. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आपली सोसायटी स्वच्छ, सुंदर असेल तर परिसराची सर्वांगीण प्रगती साधता येते. याच विचारातून 5 जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (Environment Day 2022) 5 जून ते 15 जून 2022 दरम्यान आम्ही ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ हा एक विशेष हरित उपक्रम राबवित आहोत.

Rajya Sabha Election 2022 : आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी अॅम्ब्युलन्समधून मुंबईकडे रवाना; आजारपणात बजावणार मतदानाचा हक्क

या अभियानाला सर्व सोसायटीतर्फे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि त्याचे अतिशय छान परिणाम देखील सोसायटीमध्ये व पर्यायाने परिसरात दिसत आहेत. यामध्ये झाडांचे चॉपिंग, ट्रिमिंग व कटिंग, जैविक फवारणीतून कीड नियंत्रण, झाडांना सेंद्रिय खतांचा डोस इत्यादी सेवा मोफत प्रदान केल्या जात आहेत. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी संबंधित सोसायटी मेंबर्स व परिसरातील नागरिकांचे सातत्याने विशेष सहाय्य लाभत आहे तसेच हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी कष्ट घेत असलेल्या कामगारांचेही सनी निम्हण यांनी मनापासून आभार मानले

आपण देखील आपल्या सोसायटीमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी व आपल्या सोसायटी गार्डनची निगा राखण्यासाठी आम्हाला 8308123555 वर संपर्क साधावा असे आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.