Pune News : भाजप नगरसेविकेच्या पतीची आणि भावाची नागरिकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

एमपीसी न्यूज : पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका असलेल्या अर्चना मुसळे यांचा पतीने आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अर्चना मुसळे या भारतीय जनता पक्षाच्या औंध प्रभागातील नगरसेविका आहेत. औंध परिसरातीलच क्लोरियन पार्क या इमारतीत त्या राहण्यास आहेत. मारहाण करण्यात आलेली व्यक्ती देखील याच इमारतीत राहते. संबंधित व्यक्तीने मुसळे यांच्या विरोधात बदनामी करणारी पत्रके वाटली असल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.