Borghat Accident : गॅस टँकरची पीकअप आणि कंटेनरला धडक; चारजण जखमी

एमपीसी न्यूज : गॅस टँकरने ब्रेजा पिकअप व कंटेनर ट्रेलरला पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर (Borghat Accident) मुंबईच्या दिशेने जाताना जोरदार धडक दिल्याने चारजण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक (महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट) अनिल शिंदे यांनी दिली आहे.
हा अपघात सकाळी आठ वाजता ऍपकॉन कंपनीजवळ झाला. भारत गॅस टँकर क्रमांक एमएच 12 आरएन 1167 हा टँकर पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे एक्सप्रेसवेवरून जात होता. हा टँकर 39.00 किमी या ठिकाणी पोहचला असता या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले व तो टँकर ब्रेक न लागल्याने ब्रेझा पिकअप व कंटेनर ट्रेलरला धडकला.
या अपघातात बोलेरो पिकअपमधील चार प्रवासी बाळू गोंडस (वय 23 वर्ष), दीपक स्पीकर (वय 35 वर्ष), कृष्णा गोंडे (वय 10 वर्ष), राम रोकडे (वय 38 वर्ष, सर्व रा. आष्टी, जिल्हा बीड) यांना दुखापती झाल्या. राम रोकडे हा पिकअप चालवत होता.

जखमीना रुग्णवाहिकेने खोपोली येथे (Borghat Accident) उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर एक लेन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी खुला होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. अपघातात ब्रेजा कार व गॅस टँकरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्व गाड्या बाजूला काढून तिन्ही मार्ग मोकळे करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.