Moshi News: दूध डेअरीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून दोघांना रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – दूध डेअरीमध्ये बसलेल्या दोघांना तिघांनी मिळून डेअरीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात दोघेजण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री पावणे नऊ वाजता वाघजाई दुध डेअरी मोशी येथे घडली.

शुभम रामदास बोराटे (वय 23, रा. वाघजाई मळा, बोराटेवस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष सुनिल बोराटे (रा. बोराटेवस्ती, मोशी), महेश नरवडे (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही), एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम यांची दूध डेअरी आहे. रविवारी रात्री ते त्यांच्या डेअरीमध्ये ओम सचिन बोराटे यांच्यासोबत बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी बेकायदेशीरपणे डेअरीत प्रवेश करून फिर्यादी आणि ओम या दोघांना हाताने, लोखंडी रॉडने मारून जखणी केले. तसेच फिर्यादी यांचा मोबाईल फोन हिसकावून घेऊन गेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.