Chakan News : लग्नास नकार दिल्याने जातीवाचक शिवीगाळ

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तरुणाला मुलीच्या आईने नकार दिला. या कारणावरून संबंधित तरुणाने मुलीच्या आईसोबत गैरवर्तन केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. मुलीच्या वडिलांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच मुलीच्या वडिलांना सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवून त्रास दिला. याप्रकरणी विनयभंग,बाललैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप पांडुरंग हुंबे (रा. तरसवाडी, ता. खटाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून 2012 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत खेड तालुक्यातील भोसे येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या 14 वर्षीय मुलीसोबत आरोपीला लग्न करायचे होते. मात्र या लग्नाला फिर्यादी यांनी नकार दिला. त्या कारणावरून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करून मी तुझ्या मुलीला उचलून येणार आहे व तुला पण उचलून येणार आहे, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.

फिर्यादी यांच्या पतीला फोन करून आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली. आरोपीने काही व्हिडिओ बनवून फिर्यादी यांच्या पतीच्या मोबाईलवर पाठवून त्यांना त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.