India Corona Update : दिलासादायक ! देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या खाली रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर 

गेल्या 24 तासांत 2,95,955 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आला असून तो 9.42 टक्के एवढा झाला आहे. तर, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 11.45 टक्के एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासांत देशभरात 2 लाख 08 हजार 921 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 71 लाख 57 हजार 795 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 43 लाख 50 हजार 816 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 2 लाख 95 हजार 955 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याने देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे‌. देशात सध्याच्या घडीला 24 लाख 95 हजार 591 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली असून, कोरोनाने आजवर 3 लाख 11 हजार 388 जणांचा बळी घेतला आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 157 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.14 टक्के एवढा आहे‌. तर, देशाचा रिकव्हरी रेट 89.66 टक्के एवढा झाला आहे.

देशात चाचण्यांची संख्या वाढली आहे‌. गेल्या 24 तासांत सर्वाधिक नमूने तपासण्यात आले. देशात आजवर 33 कोटी 48 लाख 11 हजार 496 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 22 लाख 17 हजार 320 चाचण्या मंगळवारी (दि.25) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

देशात 20 कोटी लोकांना घेतली लस कोरोना प्रतिबंधक लस 
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 20 कोटी 06 लाख 94 हजार 991 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 15 कोटी 69 लाख 99 हजार 310 जणांना लसीचा पहिला डोस तर, 4 कोटी 34 लाख 95 हजार 681 जणांना लस लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.