India Corona Update : दिलासादायक! देशातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या साठ हजारांच्या खाली 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 5 हजार 476 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 9 हजार 754 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या साठ हजारांच्या खाली आली आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 29 लाख 62 हजार 953 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 23 लाख 88 हजार 475 रूग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या 59,442 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.66 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत 158 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 15 हजार 036 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77.28 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 9.09 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 178 कोटी 83 लाख 79 हजार 249 जणांना लस टोचण्यात आली आहे. चोवीस तासांत 26.19 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.