India Corona Update : दिलासादायक! देशातील सक्रिय रुग्ण संख्या तीन लाखाच्या खाली 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र आहे. मागील 24 तासांत देशभरात 26 हजार 041 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 29 हजार 621 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील सक्रिय रुग्ण संख्या तीन लाखाच्या खाली आली आहे. सध्या देशात 2 लाख 99 हजार 620 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 36 लाख 78 हजार 786 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 29 लाख 31 हजार 972 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.78 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत देशात 276 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 47 हजार 194 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 56 कोटी 44 लाख 08 हजार 251 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 11 लाख 65 हजार 006 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 86 कोटी 01 लाख 59 हजार 011 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 38 लाख 18 हजार 362 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.