Talegaon : तळेगावच्या सायकलविरांनी लडाखमधील विद्यार्थ्यांना दिले सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्षा सामाजिक विकास मंडळ या संस्थेतर्फे (Talegaon) अमित गुरव व श्रीराम फाटक या दोन सायकलस्वारांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 म्हणजेच श्रीनगर ते लेह या मार्गावर असलेल्या लामायुरू, खालसी व ससपोल या गावांतील शाळांमध्ये 250 विद्यार्थी व 30 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले.

रक्षा सामाजिक विकास मंडळ या संस्थेतर्फे श्रीनगर ते लेह-लडाख अशी अतिउंचीवरील सायकल मोहीम आयोजित करण्यात आली होती. सायकलस्वारांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सायकल मोहिमेचे पथकप्रमुख प्रकाश पटवर्धन, अमित गुरव, अमित मोने, हितेन राणे यांचा समावेश होती. तसेच श्रीराम फाटक, किशोर साळवी, श्रीरंग जोशी व सहभागी झाले होते. तर, मदतनीस व छायाचित्रकार  म्हणून विशाल गायकवाड, भावेश ठक्कर व गौरव फाटक यांनी मदत केली.

Pune Police : पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमीत्त दहा किमीची दौड

या प्रशिक्षणात ढगफुटी, भूकंप व बर्फाचा कडा कोसळणे याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये स्वत:चा व इतरांचा जीव वाचविण्यासाठी सहाय्यकारी ठरणारे प्रशिक्षण देण्यात आले. याचबरोबर कोणत्याही (Talegaon) आपत्ती काळात, आपत्कालीन निर्वासन म्हणजेच कोणत्याही आपत्ती काळात, कमीत कमी वेळात कोणतीही दूर्घटना होऊ न देता, शाळेच्या वर्गामधून सर्व विद्यार्थी सुरक्षितरित्या कसे बाहेर पडले पाहिजेत, याचे प्रात्यक्षिकही त्या विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. त्या शाळेतील शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शाळांमध्ये अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पहिल्यांदाच देण्यात आले.

तर, या सायकल मोहिमेत अतिउंचीवरील विरळ हवामानात 10 हजार फूटांपेक्षा जास्त उंचीवर जेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, असे जोझिला पास 11 हजार 557 फूट, नमीकला पास 12 हजार 139 फूट, फोटूला पास 13 हजार 479 फूट हे 3 पास पाऊस पडत असताना बोचऱ्या थंडीत व काही वेळेस रणरणत्या उन्हात 37 अंश डिग्री सेल्सिअस तापमान असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पार केले.

या सायकलस्वारांनी द्रास आणि कारगिल येथे असलेल्या कारगिल वॉर मेमोरियललाही भेट दिली व 1999 मध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना मानवंदना दिली. या मोहिमेत 7 सायकलस्वार सहभागी झाले होते व मदतनीस म्हणून 3 सदस्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. याचबरोबर लेह येथील जगातील सर्वात उंच रस्ता म्हणजेच खारदुंगला पास 18 हजार 380 फूट या ठिकाणी सायकल मोहिमेतील श्रीरंग जोशी व किशोर साळवी हे सायकलस्वार अतिशय खडतर वातावरणात येथे सायकलवर पोहोचण्यात यशस्वी झाले व त्यांनी तेथे भारतीय तिरंगा ध्वज फडकवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.