Dehuroad : जमीन विक्री प्रकरणात महिलेची 40 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जमीन खरेदीसाठी (Dehuroad) महिलेने पैसे दिले. त्यानंतर जमिनीचे कागदपत्र अपूर्ण असल्याने महिलेने व्यवहार रद्द केला असता महिलेचे काही पैसे देऊन 40 हजार रुपये न देता फसवणूक केल्याची घटना 9 ऑक्टोबर 2020 ते 7 मे 2022 या कालावधीत देहूरोड येथे घडली.

महेश अशोक धुमाळ (रा. देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talavade theft case: उघड्या दरवाजावाटे 95 हजारांची चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्याकडे असलेली सरकार प्रॉपर्टीज नावाने केशवनगर, वडगाव मावळ येथील एक हजार 76 चौरस फूट जागेचा प्लॉट फिर्यादी यांना दाखवला. तो विकण्याकरिता फिर्यादी याना अपूर्ण कागदपत्रे दिली. फिर्यादीकडून दोन लाख 60 हजार रुपये घेतले. मिळकतीचे कागदपत्र अपूर्ण असल्याने फिर्यादी यांनी हा व्यवहार रद्द केला. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या रकमेपैकी 40 हजार रुपये रक्कम न देता आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड (Dehuroad) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.