Ravet News : महापालिकेच्या बीट निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त विद्यार्थ्याला मिळाले जीवदान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत परिसरात अतिक्रमण पथकाची कार्यवाही सुरु असताना अचानक झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला बीट निरीक्षक अमोल पवार, दिनेश नेहरकर आणि अमित शिंदे यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ सुंदर शहर बनविण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. शहरातील रस्त्यांवर अनधिकृतपणे हातगाड्या तसेच व्यावसायिकांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाकडून पाहणी तसेच कारवाई करणे सुरु असते. प्रशासकीय कामकाज करत असताना मानवी संवेदना जागृत ठेवून महापालिका कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. याचा प्रत्यय महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगाधावनामुळे आला.

क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मराज चौक ते गुरुद्वारा चौक,रावेत या ठिकाणी अतिक्रमण पथकाची कारवाई सुरु होती. त्यावेळी याठिकाणी एक भीषण अपघात झाला. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील वाहतूक मोकळी करून गंभीर जखमी झालेल्या बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्यास त्यांनी तेथील नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्या विद्यार्थ्याने सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.