Chakan News : शॉपिंग सेंटर मध्ये पहाटे भीषण आग

चाकण मधील घटना

एमपीसी न्यूज : चाकण शहराच्या मध्यवस्तीतील एका शॉपिंग सेंटरला रविवारी (दि. 24 ) पहाटे तीन च्या सुमारास आग लागली. सुमारे तासाभरात हि आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तो पर्यंत हे संपूर्ण दुकान आगीत जाळून खाक झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रामदेव शॉपिंग सेंटर या आगीत जाळून खाक झाले आहे. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हि घटना स्थानिकांच्या लक्षात आली. तत्काळ चाकण अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तो पर्यंत संपूर्ण दुकान आगीत स्वाहा झाले होते.

लगतच्या दुकानांना आगीची झळ पोहचू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे येथील वेदांत संकुल भागातील अन्य दुकाने वाचल्याचे प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी सांगितले.  आगीत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले असले तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.