Hinjawadi Crime News : सोन्याचे दागिने काढून घेत, घेतला अडीच लाख रुपये हुंडा

एमपीसी न्यूज – विवाहितेचे सोन्याचे दागिणे काढून घेत, अडीच लाख रुपये हुंडा घेतला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 एप्रिल 2017 ते 07 फेब्रुवारी 2020 या दरम्यान सातारा रोड सातारा, केशव नगर, अमळनेर, जळगाव येथे ही घटना घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती, सासु-सासरे, दिर, जाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, शारिरिक व मानसिक छळ केला. पतीने विवाहित महिलेचे सोन्याचे दागिणे संमतीशिवाय काढून घेतले आणि माहेरच्या लोकांकडून 2 लाख 51 हजार रुपये हुंडा स्वीकारला. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.