Wakad Crime News : लग्नाच्या आमिषाने महिलेची पाच लाखांची आर्थिक फसवणूक आणि विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून पाच लाख रुपये घेतले. ते पैसे परत न करता तिची फसवणूक केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 22 जुलै 2021 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत भूमकर चौकाजवळ वाकड येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विन शुक्ला (रा. बालेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान त्याने महिलेसोबत व्हाट्सअप वरून संपर्क करत असताना त्याचे नाव अश्विन शुक्ला असे सांगितले. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या इच्छे विरुद्ध त्यांच्याशी अश्लील कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी फसवणूक आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.