Pune News : अजित पवार यांनी आत्मपरीक्षण करावे – माजी मंत्री बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – भाजपचे युवा उमेदवार प्रदीप कंद यांच्या जिल्हा बॅंक निवडणुकीतील विजयाने साम, दाम, दंड भेद आणि सत्तेचा दुरुपयोग करणार्या पालकमंत्री अजित पवार यांना स्वत:च्याच जिल्ह्यात जबरदस्त धक्का बसला असून आता या पराभवाने त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे आवाहन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केले आहे.

भेगडे म्हणाले, ‘कंद यांचा पराभव करण्यासाठी पवार यांनी कंबर कसली होती. कंद यांना गद्दार असे संबोधले होते. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना फोन करून ताकद लावा, कंद यांचा पराभव करा असे आदेश दिले होते. परंतु जिल्ह्यातील पदाधिकारी आता अजितदादांचा आदेश जुमानत नाहीत हेच कंद यांच्या विजयाने अधोरेखित झाले आहे.’

भेगडे पुढे म्हणाले, ‘कंद यांना 405 आणि त्यांचे विरोधक राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना 391 मते मिळाली. जुन्नर, हवेलीत कंद यांना मोठी आघाडी मिळाली. विशेष म्हणजे अजितदादांच्या घरच्या मैदानात बारामतीत कंद यांना 52 मते मिळाली. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या वर्षानुवर्षाच्या जिल्ह्यातील वर्चस्वाला मोठा धक्का बसला असून, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.