Nigdi Crime News : लग्नाचे आमिष देऊन बलात्कार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज – तरुणीला प्लॉट दाखवायला म्हणून घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी तिचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. तरुणाने तरुणीशी लग्न न केल्याने तरुणीने थेट तरुणाचे घर गाठले. मात्र तरुणाच्या घरच्यांनी देखील तरुणीला धमकावले. हा प्रकार 14 फेब्रुवारी 2021 ते 23 एप्रिल 2022 या कालावधीत थरमॅक्स चौक, निगडी येथे घडला.

पीडित तरुणीने शनिवारी (दि. 23) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण धोंडीबा गुंजवटे, भाऊ राहुल गुंजवटे,बहिण, आई (सर्व रा. देहूगाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण याने फिर्यादी तरुणीसोबत मैत्रीचे संबंध निर्माण केले. तिला प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून घेऊन गेला. त्यानंतर कोणाच्यातरी घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी त्याचा व्हिडीओ आरोपीने बनवला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणाने फिर्यादी तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध केले.

आरोपी प्रवीण याने फिर्यादी यांना त्यांच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले असताना त्याने दुस-या मुलीसोबत लग्न करण्याचे ठरवले. फिर्यादीस हा प्रकार समजताच त्यांनी आरोपीचे घर गाठले. त्याच्या घरच्यांना तरुणीने विचारणा केली असता आरोपी प्रवीणचा भाऊ, बहिण आणि आई यांनी फिर्यादी तरुणीला धमकी देऊन घराबाहेर काढले. तिला मारहाण करून ‘तुला जे काय करायचे आहे ते तू कर. आमच्या घरासासमोर पुन्हा यायचे नाही’ असे म्हणत तरुणीला आरोपींनी हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.