Wakad Crime News : अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज – अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. 22 ते 26 मे 2021 दरम्यान दत्त मंदिर, वाकड परिसरात हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पिडित महिलेने गुरुवारी (27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईल धारकाविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईल धारकाने (7559252350 / 9079263678) या नंबरवरुन पिडीत महिलेला अश्लील मेसेज केले तसेच, व्हिडिओ कॉल करून अश्लील आवाज काढून महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगारे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.