Talavade Crime News : तरुणावर कोयत्याने वार करून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून अडवले. त्यानंतर कोयत्याने वार करत त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री साडेबारा वाजता तळवडे-चाकण रोडवर घडली.

शुभम ऋषिनाथ राऊत (वय 19, रा. तळवडे-चाकण रोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राऊत हे तळवडेकडून चाकणच्या दिशेने पायी चालत घरी जात होते. ते चाकणकडे जाणा-या ब्रिजवर आले असता एका मोपेड दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी राऊत यांना ‘चाकणला जाणारा रस्ता कोणता आहे’ असे विचारले. एकाने राऊत यांना दगड मारण्याचा प्रयत्न केला. तर दुस-याने कोयत्याने राऊत यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर पाच हजारांचा एक मोबाईल फोन घेऊन आरोपी पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.