Pimpri : बालविवाह प्रकरणी पती व सासऱ्याला अटक, मुलीच्या प्रसुतीवेळी प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – 17 वर्षाच्या मुलीशी बालविवाह करुन तिला गर्भवती केल्याप्रकऱणी पती व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Pimpri) हा सारा प्रकार मुलगी प्रसुतीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल झाली त्यावेळी उघडकीस आला. मात्र दुर्दैवाने यावेळी तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात महिला पोलीस नाईक अलका भोसले य़ांनी तक्रार दाखल केली असून पती केशव रघुनाथ काळे (वय 21 रा. चाकण) सासरे रघुनाथ लक्ष्मण पवार (वय 45 रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News : महिलेची गाडी अडवून तिच्याशी गैरवर्तन करत शिवीगाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता हि आरोपीची नातेवाईक आहे. ती 17 वर्ष 6 महिन्यांची आहे हे माहिती असताना देखील आरोपीने व त्याच्या वडिलांनी पीडितेचा बालविवाह केला. (Pimpri) पुढे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले. प्रसुतीसाठी तिला पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता तिचा गर्भ मृत्यू पावला. प्रसुतीवेळी मुलीचे वय उघडकीस आल्याने आरोपींना पोलिसांनी अटक केली असून चाकण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात  बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.