Dehuroad Crime News : पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून; पतीला अटक 

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून झालेल्या पती-पत्नीच्या भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. देहुगावात गुरुवारी (27) रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी पतीला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पुजा वैभव लामकाने (वय 19) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तिचा पती वैभव भगवान लामकाने (वय 23, रा. साईनगरी, वडाचा माळ, देहूगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

खून झालेल्या महिलेचे वडील सोमनाथ रामदास पाटील (वय 50, रा. मित्र मंडळ बाजार आळी, देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा आणि वैभव या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. भांडणात पुजाने वैभवला आई वरुन शिवी दिली. शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने पत्नीचा गळा दाबून खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी पतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.