Akurdi News : कामगार कायदे राहिले नाही तर, कामगार जगणार कसा? –  इरफान सय्यद

शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचा कामगार दिनी केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याचा निषेध

एमपीसी न्यूज – मोदी सरकारने केंद्र सरकारचे कार्पोरेट धार्जिणे कायदे व मागील वर्षी देशाच्या संसदेत मतदान न घेता देशातील कामगार कायदे मोडीत काढून कामगारांना उद्योगपती, मालक / व्यवस्थापनाचे गुलाम बनवणारे चार कामगार कायदे परित केले. देशातील लाखो कामगार या कायद्यांना विरोध करीत होता व आहे. परंतु गेंड्याच्या कातडीचे केंद्र सरकार त्यांना दाद देत नाहीत. कामगार कायदे राहिले नाही तर, कामगार जगणार कसा? असा सवाल  कामगार नेते इरफान सय्यद यांनी केला.

नवीन कामगार कायद्याविरोधात कामगार दिनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार जाहीर निषेध म्हणून भारतीय कामगार सेना कार्यालय तथा शिवसेना भवन, आकुर्डी ते तहसीलदार कार्यालय, प्राधिकरण असा लाँग मार्च / निषेध मोर्चा काढण्यात आला.  या निषेध मोर्चाची सुरवात सकाळी 10 च्या सुमारास झाली. तहसीलदार कचेरी येथे हा मोर्चा दाखल झाला.

यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, भारतीय कामगार सेनेचा विजय असो, इस जोर जुलम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा हैं, मोदी सरकार चा निषेध असो, अशा अनेक घोषणा कामगारांनी दिल्या. आजचा जागतिक कामगार दिन/ महाराष्ट्र दिनाची चळवळ आणि अनेक नेत्यांचा त्याग – बलिदान व आंदोलनाचे आठवण करून देणारा होता. मोर्चा दाखल झाल्यानंतर विविध कंपन्यांच्या युनिट प्रतिनिधिनी आपली मनोगते व्यक्त केली.

भारतीय कामगार सेनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष मनोहर भिसे म्हणाले, ज्या देशातील कामगारांनी, कष्टक-यांनी अखंड भारताला सुजलाम सुफलाम केले, त्यांना मोडीत काढण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे. तसेच कामगार कायद्यात कामगार विरोधी कोणते कायदे पारित झाले व त्यांचे भविष्यात उद्भवणारे दुष्परिणाम याची माहिती देऊन कामगारांना सदैव एकजुटीने राहण्याचा संदेश दिला. कामगार विरोधी कायदे रद्द न झाल्यास पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

भारतीय कामगार सेना, महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद म्हणाले की, केंद्र सरकारने कामगारांना उध्वस्त करण्याचा कट रचला आहे. कामगार कायदे राहिले नाही तर कामगार जगणार कसा? आपल्या पिढीला पोसणार कसा? कामगार हा शब्दच जर या कायद्याच्यामुळे नष्ट होणार असेल तर 1 मे कामगार दीन हा कामगार विरोधी कायद्याचा निषेध दिवस म्हणून पाळूयात, असा संदेश कामगारांना दिला.

तदनंतर तहसीलदारांना आपल्या मागण्याचे निवेदन देऊन कार्यक्रमाचा राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जाधव यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय कामगार सेनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष मनोहर भिसे आणि भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी केले. या प्रसंगी शिवसेना अंगीकृत सर्व कामगार संघटना, कष्टकरी जनरल माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्व युनिटचे युनिट प्रतिनिधी विनायक मोरे , शिवाजी पाटील , कार्यकारणी सदस्य नागेश साळवी , युनिट प्रतिनिधी नितीन चोरमले , उदयसिंह जाधव , दत्तात्रय कोळेकर , नवनाथ बग , सागर सातकर , रमणसिंह सिसोदिया , किरण भोळे , संदीप भेगडे , ज्ञानदेव कदम , गणेश भेगडे , सुशील भंडलकर , तुकाराम कवाडे , आर डी कुलकर्णी , श्री पासवान , खंडू गवळी , भिवाजी वाटेकर , पांडुरंग काळोखे , ज्ञानोबा कोधरी , आबा मांढरे , सोमा फुगे , नागेश व्हनवटे, अशोक साळुंके , सुनील सासवडे , सिध्देश्वर काशीद , सचिन चौधरी , अरुण जोगदंड , नाना नाईकवडे , सागर राऊत, धीरज चव्हाण , दीपक शिंगोटे , प्रकाश जाधव व हजारो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.