India Corona Update : चोवीस तासांत 41 हजार रुग्ण कोरोनामुक्त, 624 मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतात नव्या कोरोना रुग्णापेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 41 हजार बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर, 38 हजार 792 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच, 624 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 09 लाख 46 हजार 074 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 01 लाख 04 हजार 720 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली सध्या 4 लाख 29 हजार 946 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात आजवर 4 लाख 11 हजार 408 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा आहे. तर, रिकव्हरी रेट 97.28 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 43 कोटी 59 लाख 73 हजार 639 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 15 हजार 501 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 38 कोटी 76 लाख 97 हजार 935 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 37 लाख 14 हजार 441 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.