India Corona Update : 1 लाख 60 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, मृत्यूदर 1.37 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तसेच मृतांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात देशभरात 199 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत देशात 1 लाख 60 हजार 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्क्यांवर पोहचला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 40 हजार 715 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 16 लाख 86 हजार 796 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 11 लाख 81 हजार 253 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 29 हजार 785 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएमआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 23 कोटी 54 लाख 13 हजार 233 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 67 हजार 459 चाचण्या सोमवारी (दि. 22) रोजी करण्यात आल्या आहेत.

देशात सध्या 3 लाख 45 हजार 377 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा आहे‌. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.67 टक्के एवढं झाले आहे. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी 84 लाख 94 हजार 594 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.