India Corona Update: कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 32,695 नवे रुग्ण तर 606 जणांचा मृत्यू

India Corona Update: In the last 24 hours, 32,695 new patients and 606 died देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून सध्या देशातील रिकव्हरी रेट 63.24 टक्के एवढा झाला आहे.

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत देशात तब्बल 32,695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 9,68,876 रुग्ण झाले आहे. पैकी सध्या देशात 3,31,146 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 6,12,815 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडा 24,915 इतका झाला आहे.

देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून सध्या देशातील रिकव्हरी रेट 63.24 टक्के एवढा झाला आहे. मागील 24 तासांत देशभरात 20,783 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयएमसीआरने) दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 लोकांची चाचणी झाली आहे. पैकी 3,26,826 चाचण्या या बुधवारी (दि.15) करण्यात आल्या आहेत.

वाढलेले चाचण्यांचे प्रमाण, वेळेवर होणारे निदान आणि प्रभावी उपचार या तीन बाबींमुळे सातत्याने रुग्णांची वाढ होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे.

गेल्या आठ दिवसांत 25 हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज 32 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वाढली आहे. आठ दिवसांत दोन लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे.

View this post on Instagram

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत देशात तब्बल 32,695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. . For more details check out our website Link in bio . #indiafightscorona #coronaindia #coronaupdate #coronaupdates #coronainindia #coronaupdatesindia #coronaupdatesinmarathi #mpcnews #i_support_mpcnews #marathinewsupdates #marathinews

A post shared by MPC News Pvt. Ltd. (@mpcnews.in) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.