India Corona Update: नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत 15,968 रुग्णांची वाढ, 465 मृत्यू

India Corona Update: New highs An increase of 15,968 patients, 465 deaths in the last 24 hours देशातील एकूण बाधितांची संख्या साडेचार लाखांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा 4,56,183 वर जाऊन पोहोचला आहे.

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत आजवरची विक्रमी 15,968 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 465 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण बाधितांची संख्या साडेचार लाखांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा 4,56,183 वर जाऊन पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 465 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशभरात आजवर 14,476 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी 2,58,685 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, 1,83,022 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

देशात 23 जूनपर्यंत 73,52,911 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मागील 24 तासांत तब्बल 2,15,195 चाचण्या करण्यात आल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेली देशातील पाच राज्ये (कंसात मृत्यू)
महाराष्ट्र- 1,39,010 (6,531)
दिल्ली- 66,602 (2,301)
तामिळनाडू- 64,603 (833)
गुजरात- 28,371 (1,710)
उत्तर प्रदेश- 18,893 (588)

भारतात प्रति एक लाख लोकसंख्येमागे सर्वांत कमी मृत्यू आहेत. भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण अवघे एक आहे. तर, जागतिक सरासरी त्याच्या सहापटीपेक्षा जास्त म्हणजे 6.04 आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 22 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या 154 व्या कोरोनाच्या जागतिक परिस्थिती अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.