-MPC-TOP-MOST-BANNER-I

India Corona Update: नकोसा विक्रम! 24 तासांत देशभरात 77,266 नवे रुग्ण, 1,057 जणांचा मृत्यू

India Corona Update: recorded 77,266 new patients, 1,057 deaths across the country in 24 hours देशात आजवर 3 कोटी 94 लाख 77 हजार 848 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 01 हजार 338 नमुने हे गुरुवारी (दि.27) रोजी तपासण्यात आले आहेत.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून गेल्या 24 सलग दुसऱ्या दिवशी 77 हजार 266 विक्रमी रुग्णांची नोंद झाली. तसेच, 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 33.87 लाखांवर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 33 लाख 87 हजार 501 एवढी झाली आहे. यापैकी 7 लाख 42 हजार 023 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 25 लाख 83 हजार 948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात दिवसेंदिवस विक्रमी रुग्णांची होणारी नोंद चिंताजनक आहे.

मागील 24 तासांत देशभरात 1,057 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आजवर तब्बल 61 हजार 529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आजवर 3 कोटी 94 लाख 77 हजार 848 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 01 हजार 338 नमुने हे गुरुवारी (दि.27) रोजी तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. देशात होणा-या चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचे प्रमाण देखील वाढले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात मागील 24 तासांत 60 हजार 177 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 76.24 टक्के एवढा झाला आहे तर मृत्युदर 1.83 टक्के एवढा आहे. देशातील 10 राज्य कोरोनाचे संकट यशस्वीपणे हाताळत असून तेथील मृत्युदर हा राष्ट्रीय टक्केवारी पेक्षा कमी आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक 1 लाख 78 हजार 561 सक्रिय रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn