India Corona Update: देशात कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांवर तर एक लाख रुग्ण कोरोनामुक्त

India Corona Update: The number of corona cases in the country is over two lakh and one lakh patients are corona free

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 8909 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली असून भारतात एकूण कोरोना बाधितांची संख्या 2,07,615 एवढी झाली आहे.

एका दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येपैकी ही आजवरची सर्वात मोठा वाढ आहे. गेल्या 24 तासांत 8909 नवीन कोरोना रूग्णांच्या वाढीमुळे भारतात कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे.

आजवर 100302 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून 101497 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशात भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जून महिन्याच्या शेवटी अथवा जुलै महिन्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होऊ शकते.

दरम्यान, इंडियन काऊन्सिल ऑफ़ मेडिकल रिसर्चच्या डॉ. निवेदिता गुप्ता यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमणाच्या सर्वात खराब परिस्थितीपासून देश अजून दूर आहे. तसेच जुलै महिन्यात कोरोना रुग्णांचा संख्येत घट होऊ शकते.

सर्वाधिक रुग्ण संख्या असलेली पाच राज्य (कंसात मृत्यू )

महाराष्ट्र – 72300 (2465)

तमिळनाडू – 24586 (197)

दिल्ली – 22132 (556)

गुजरात – 17617 (1092)

राजस्थान – 9373 (203)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.