MAHAVITARAN News : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस्अॅपद्वारे माहिती द्या; महावितरणचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीजयंत्रणा धोकादायक आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी मोबाईलच्या व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी असे आवाहन महावितरणकडून (MAHAVITARAN)  करण्यात आले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून (MAHAVITARAN)  उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्यास त्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर कॉल करण्याऐवजी फक्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हॉटस् अॅपद्वारे द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

Blood Donation Camp : डी. वाय. पाटील विद्यापीठ आंबी येथे रक्तदान शिबिरात 70 जणांचे रक्तदान

महावितरणची (MAHAVITARAN)  वीजतार तुटलेली आहे. झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, मुसळधार व संततधार पावसामुळे माती वाहून गेल्याने किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे इत्यादी स्वरुपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह महावितरणच्या व्हॉटस् अॅप मोबाईल क्रमांकावर पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क साधून धोकादायक यंत्रणेची माहिती देण्याची सेवा उपलब्ध आहे.

Ketaki Chitale : सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं

व्हॉटस् अॅपद्वारे महावितरणला नादुरुस्त किंवा धोकादायक वीजयंत्रणेची माहिती प्राप्त होताच ती ताबडतोब संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयांना पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस् अॅपद्वारेच यंत्रणेच्या दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.