Pune Crime News : पुण्यात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट सेंटरचा पर्दाफाश

चायनीज सेंटरच्या नावाखाली चालू होते आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट सेंटर

एमपीसी न्यूज – विमानतळ पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली तर उजबेकिस्तान, नेपाळ, दिल्ली आणि मुंबई येथील चार महिलांची सुटका करण्यात आली. राहुल संन्यासी असे ताब्यात घेतलेल्या एजंटचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हा मूळचा आसाम येथील रहिवासी आहे. पुण्यातील विमानतळ परिसरात तो मागील काही वर्षापासून राहतो आणि तिथेच चायनीजची गाडी आणि छोटे हॉटेल तो चालवयाचा. परंतु त्याचा मुख्य व्यवसाय म्हणून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणे असे.

विमानतळ पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार सचिन जाधव यांना याविषयी माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत त्याला गजाआड करायचे ठरवले. दरम्यान, बनावट ग्राहक द्वारे त्याच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर साकोरे नगर येथे दोन रिक्षामधून चार तरुणींना घेऊन आल्यानंतर पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याच्याकडून जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राहुल हा फक्त व्हाॅट्सअप मेसेज व व्हाॅट्सअप कॉल वर बोलत असे. एखादा ग्राहक मिळाल्यानंतर त्याच्याकडून तो एक ते दोन हजार रुपये घेत असे. त्यानंतर ग्राहकालाच एखादा हॉटेल मध्ये रूम बुक करायला सांगत असे. रूम बुक केल्यानंतर तो स्वतः मोटार सायकल किंवा रिक्षाने तरुणी घेऊन त्या ठिकाणी पोहोचत असे. त्यानंतर पुढील व्यवहार या तरुणींशी करून दिलेल्या पैशांपैकी अर्धे पैसे राहुल स्वतः घेत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.