Talegaon News : सोमाटणे येथे घरफोडी करून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घराचे कुलूप तोडून घरातून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजता सिल्व्हाना सोसायटी येथे उघडकीस आली.

वैशाली सूर्यकांत जोगदंड (वय 34, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोगदंड यांचा फ्लॅट रविवारी (दि. 8) दुपारी दोन ते मंगळवारी (दि. 10) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होता. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूम मधील लोखंडी कपाट फोडून त्यातून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.