Bhosari Crime News : शोरूमच्या पार्किंग मधून आलिशान कार चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी येथील संजय हुंदाई या शोरूमच्या पार्किंगमधून कार चोरीला गेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सकाळी दहा ते शनिवारी (दि. 14) सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत घडली.

प्रशांत पंडित सुतार (वय 40, रा. दिघी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील संजय हुंदाई शोरूमच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने 10 लाख रुपये किमतीची एक कार कशाच्यातरी साहाय्याने चालू करून चोरून नेली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.