Pimpri News :  महाराष्ट्र बंद! पीएमपीएमएलची वाहतूक सेवाही बंद

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या केंद्रीय मंत्री पुत्राने धावते वाहन घातल्याने चार शेतक-यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने आज (सोमवारी) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. सकाळपासून बंदला सुरुवात झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेली पीएमपीएमएल बस देखील बंद आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनाने कार्यालयात जावे लागत आहे. 

उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या मंत्री पुत्राने धावते वाहन घातले. यात चार शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी  महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने आज (सोमवारी) महाराष्ट्र बंद पुकारला आहे. बंदला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. दुकाने बंद ठेवली जात आहेत. नागरिकांकडूनही बंदला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेली पीएमपीएमएल बस देखील बंद आहे. पीएमपीएमएलच्या निगडी डेपोतील सगळ्या गाड्या सकाळपासून बंद आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच बस बंद असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. खासगी वाहनाने नागरिकांना कार्यालयात जावे लागत आहे. दुपारपर्यंत बस बंद राहतील असे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.