Talegaon Dabhade News : मीनल कुलकर्णी यांना भरतनाट्यम् मध्ये ‘पीएचडी’ पदवी प्राप्त  

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सृजन नृत्यालयाच्या संचालिका मीनल कुलकर्णी यांना भरतनाट्यम् मध्ये ‘पीएचडी’ ही पदवी प्राप्त झाली आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची पीएचडी (संगीताचार्य ) परीक्षा भरतनाट्यम् विषय घेऊन त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.

“भरतनाट्यम् नृत्य शैलीतील वर्णम् या रचनेचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर मीनलताईंनी शोध निबंध सादर केला. डाॕ.स्वातीताई दैठणकर व डाॕ. लक्ष्मी पंडितधर यांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन  मिळाले.

वर्णम् ही भरतनाट्यम् मधील एक पारंपरिक रचना आहे. वर्णम् ची निर्मिती, त्या मागचा सांगितिक विचार व कारणे, काळानुसार त्यात घडलेले बदल व वर्णम् च्या प्रकारांचा तौलनिक अभ्यास यावर मीनलताईंनी संशोधन केले आहे.

सृजन नृत्यालयाच्या वतीने त्यांच्या पीचडीच्या प्रवासाविषयी प्रकट मुलाखत घेण्यात आली. ताई आपटे सभागृहात कोविडचे सर्व नियम पाळून “अभ्यासोनी प्रकटावे” ही मुलाखत घेण्यात आली. दिनेश कुलकर्णी, शरयू पवनीकर, संपदा थिटे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.