Pimpri News : घरगुती सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात मनसेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – घरगुती सिलेंडरचे वाढलेले दर आणि पेट्रोल, डिझेलच्या दररोज होणा-या दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड शहर मनसेने आज (शुक्रवारी) आंदोलन केले.

पिंपरी चौकात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राजू सावळे, मयुर चिंचवडे, हेमंत डांगे, बाळा दानवले, विशाल मानकरी, रुपेश पटेकर, सुशांत साळवी, सचिन शिंगाडे, दत्ता देवतरासे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, सुजाता काटे, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, अविनाश तरडे, विशाल साळुंखे, अनुज महाजन, प्रफुल्ल कसबे, नितीन चव्हाण, नारायण पठारे, आकाश पांचाळ,राजू भालेराव, विनोद भंडारी, नारायण पठारे, फैयाज नदाफ, ॲलेक्स मोजेस, सुरेश सकट, शिशिर महाबळेश्वरकर, जय सकट, प्रदीप घोडके, नीलेश नेटके, आकाश लांडगे, रॉबिन त्रिभुवन, विशाल साळुंखे, गणेश उज्जनकर, परमेश्वर त्रिमले, नीरज कांबळे, कृष्णा महाजन, स्नेहल बांगर आदी सहभागी झाले होते.

सचिन चिखले म्हणाले, गेल्या नऊ वर्षांपासून महागाईत वाढ होतच आहे. यापूर्वी काँग्रेस सारख्या पक्षाने सत्तेत राहून महागाई आटोक्यात आणली नाही. त्यामुळे आता सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारला नागरिकांनी निवडून दिले. पण, काँग्रेसच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन चालणारे भाजप कुठेही मागे न हटता सर्व महागाईच्या सीमा ओलांडत आहे. घरगुती सिलेंडर, खाद्य तेल , पेट्रोल , डिझेल , अन्यधान्य, व रोजच्या वापरण्यात येणारे वस्तूंचे भाववाढ करून गोरगरिबांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नागरिकांची कोविडची लाटेतून सुटका झाली. पण, महागाईची लाट कायम ठेवली आहे. महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.