Pimpri News : महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना कोरोना लस घेतल्याचे लेखी कळवावे लागणार

आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचा-यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यांनी त्वरित लस घ्यावी. लस घेतल्याबाबतचे लेखी स्वरुपात आपल्या विभागात, कार्यालयात कळविण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या आस्थापनेवर गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात (शिक्षक कर्मचा-यांसह) एकूण 7 हजार 479 अधिकारी, कर्मचारी काम करतात. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना युद्ध पातळीवर राबविण्या येत आहेत. महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी रहावे. कोरोना आजारापासून संरक्षण मिळावे. याकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.

जास्तीत-जास्त नागरिकांना आणि महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लसीकरण करुन घेण्याबाबत यापूर्वीच वेळोवेळी अवगत करण्यात आले आहे. तरी, देखील अद्यापर्यंत बहुतांशी अधिकारी, कर्मचा-यांनी लस घेतली नसल्याचे निर्देशनास आले आहे.

महापालिका आस्थापनेवरील ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी अद्यापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. त्यांनी त्वरित नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घ्यावी. लस घेतल्याबाबत तसे लेखी स्वरुपात आपल्या विभागात कळवावे असे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.