Pimpri News : लोकशाही टिकविण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज – सचिन साठे

एमपीसी न्यूज – 1857 पासून सुरु झालेल्या स्वातंत्र्य लढ्याची फलश्रृती 1947 ला स्वातंत्र्यप्राप्तीने झाली. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. ही लोकशाही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात धोक्यात आली असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही मानणा-या लोकांनी आता लोकशाही टिकविण्यासाठी पुन्हा लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केले.

असंघटीत कामगार काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते. साठे यांच्या हस्ते मिलिंदनगर, आंबेडकर कॉलनी, बौद्ध नगर, भाटनगर, पत्राशेड आदी भागातील असंघटित कामगारांना ई-श्रम कार्डचे मोफत वाटप करण्यात आले.

महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, घरेलू महिला काँग्रेस प्रदेश समन्वयक शितल कोतवाल, शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुध्दीन शेख, महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग सचिव किशोर कळसकर, पर्यावरण विभाग महाराष्ट्र सचिव अशोक काळभोर, प्रदेश महिला काँग्रेस कार्यकारिणी सदस्या शोभा पगारे, पर्यावरण काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय शहरकर, ज्येष्ठ नेते संदेश नवले, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ,

कमला श्रोत्री, विशाल कसबे, फुले, शाहू, आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अशोक गायकवाड, ॲटो रिक्षा चालक मालक संघटना शहराध्यक्ष दिलीप साळवे, भिम शक्ती संघटना शहरकार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, राम डोंगरे, अशोक साबळे, देविदास साळवे, ज्योती सूर्यवंशी, कुसुम भोळे आदी उपस्थित होते. स्वागत सुंदर कांबळे, सूत्रसंचालन शितल कोतवाल आणि आभार वृषाली कदम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.