NIA Update : मुंबईत ‘दाऊद’च्या संबंधित व्यक्तींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून धडक कारवाई

एमपीसी न्यूज : आज मुंबईमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA Update) म्हणजेच एनआयएने मोठी धडक कारवाई केली आहे. सुमारे २९ ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर आले आहे. ही छापेमारी दाऊदशी संबंधित असल्याच्या संशयावरून करण्यात आली आहे.

या आठवड्याच्या प्रारंभीच राष्ट्रीय तपास यंत्रणेने २९ जागांवर छापे मारून सर्वांना धक्का दिला. या कारवाईमध्ये काही लोकांना अटक करण्यात आली आहे. बोरिवली, सांताक्रूझ, नागपाडा, गोरेगाव, भेंडी बाजार या मुंबईतल्या ठिकाणासोबतच ठाण्यातील मुंब्राही एनआयएने (NIA Update) सोडला नाही.

मुंबईतील माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खांडवानी यांच्या मालमत्तांवरही  छापे मारण्यात आले असून, माहीममध्ये ४ ठिकाणांवर छापे मारण्यात आले आहेत. त्यात अब्दुल कय्युमला ताब्यात घेतले आहे.  तसेच, ग्रँट रोडमध्ये छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला ताब्यात घेण्यात आले आहे. पायधुनी भागात दाऊद ट्रस्ट नावाची संस्था चालवणाऱ्या  71 वर्षीय वृद्धालाही ताब्यात घेतले आहे. या सर्व अटक झालेल्या व्यक्ती या दाऊदसोबत संबधित असल्याचे एनआयएने म्हंटले आहे.

दाऊदशी संबंधित ड्रग पेडलर्स, शार्प शूटर्स,  आणि हवाला ऑपरेटर एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.

Smuggling on Pune-Dubai – सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे विमानतळावर अटक

 सुहेल खांडवानी कोण?

माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खांडवानी आहेत. या शिवाय ते मुस्लिम समाजाचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांचा खांडवानी समूह आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. एनआयएने त्यांच्या सर्व व्यवसायिक ठिकाणी आणि विकासक कार्यालयावर छापेमारी केली आहे.

अचानक अटकेचे कारण?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA Update) अचानक केलेल्या छापमारीचे कारण काय? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती गोपनीय सुत्रांद्वारे समजले आहे, की दाऊद गँग पुन्हा मुंबईत सक्रिय झाली आहे. तर, त्यांच्याकडून मोठ्या व्यक्तीला घातपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.