PMPML News : महापालिकेने संचलन तुटीपोटी दिले 86  कोटी रुपये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळ( पीएमपीएमएलला) संचलन तुटीपोटी 86 कोटी रुपये दिले.

पुणे महापालिका परिवहन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन विभागाचे एकत्रीकरण करून 2007 मध्ये पीएमपी अस्तित्वात आली आहे. दोन्ही शहरांत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविली जाते.  राज्य सरकारच्या 2014 च्या आदेशानुसार दरमहा संचलन तुटीची 60 टक्के रक्कम पुणे महापालिकेने आणि 40 टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीला द्यायची आहे. 2021-22 च्या अंदाजित संचलन तूट 790  कोटी 61 लाख रुपये आहे. महापालिकेचा 40 टक्के  हिश्यानुसार संचलन तुटीचा हिस्सा 316  कोटी 24  लाख रुपये नमूद केला आहे.

त्यातील 26 कोटी 35  लाख रुपये एप्रिल महिन्याच्या तुटीप्रकरणी देण्याची मागणी पीएमपीने महापालिकेकडे केली होती. मात्र, महापालिकेच्या पीएमपीएमएल निधी लेखाशिर्षातील तरतूद 219 कोटी 38 लाख रुपये आहे. त्यात संचलन तुटीपोटी 201 कोटी 38  लाख आणि विविध पासचा खर्च 10 कोटी व तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आठ कोटी रुपयांचा समावेश आहे.

या रकमेतून एप्रिल महिन्याच्या तुटीपोटी 16 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच 2022-23 च्या अंदाजित संचलन तुटीपोटी अग्रिम स्वरूपात 70 कोटी रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.