Nigdi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक; पिस्टल, तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने एकास अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत.

गणेश निंबा महाले (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळसाकांत रोड, निगडी येथे टीजेएस बॅंकेजवळ आरोपी निलेश पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी निलेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 35 हजार 600 रुपयांची एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतूसे जप्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.